पिंपरी l प्रतिनिधी
दुचाकीवरून घरी जात असलेल्या दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत चाकूने वार करून लुटले. ही घटना १३ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता आंबेठाण रोड, आंबेठाण येथे घडली.
समीर प्रभुदास कापगते (वय २२, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ १३ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता कंपनीतून कामावरून घरी जात होते. ते ऍमेझॉन कंपनीच्या पुढे निघाले असता त्यांना तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी अडवले. फिर्यादी आणि त्यांच्या भावाला हाताने, काठीने मारहाण करून खिशातील सर्व पैसे बाहेर काढा नाहीतर तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी दिली. त्यातील एका आरोपीने चाकू काढून फिर्यादी यांचा भाऊ दीपक कापगते याच्या उजव्या हातावर मारून जखमी केले. त्यानंतर आठ हजारांचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.