TOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ बँका झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देतात चांगले व्याज

नवी दिल्ली |
देशात अशा अनेक बँका आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा देतात. म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यातून सर्व पैसे काढले तरीही बँकेकडून कोणताही चार्ज आकारला जात नाही. त्यामुळे ज्यांचे मासिक उत्पन्न फिक्स नसते, अशा ग्राहकांसाठी झिरो बॅलन्स खाते फायदेशीर ठरते. तसेच फार कमी जणांनी हेदेखील माहिती नसेल की, आपल्या देशात अशाही काही बँका आहेत, ज्या झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावरदेखील चांगल्या सुविधा तसेच व्याजदर देतात. आज आपण अशाच काही बँकांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर चांगले व्याज देतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया

ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत सेव्हिंग खाते उघडल्यास बँकेकडून मोफत डेबिट कार्डची सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर 2.7 टक्के व्याज देण्यात येते.

येस बँक

येस बँकेतही सेव्हिंग खात्यावर तुम्हाला डेबिट कार्डची सुविधा मिळते. तुम्ही एका दिवसात चाळीस हजारांपर्यंत रक्कम काढ़ू शकता. तसेच या बँकेत झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर चार टक्के दराने व्याज देण्यात येते. मात्र ज्यांना मासिक पगार मिळतो किंवा जे नोकरदार आहेत तेच या बँकेत खाते उघडू शकतात.

आयडीएफसी फर्स्ट बँक

आयडीएफसी फर्स्ट बँकेत खाते उघडण्याचा मुख्य फायदा म्हणजे ही बँक येस बँकेप्रमाणेच झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर ग्राहकांना चार टक्क्यांपर्यंत व्याज देते. तसेच या बँकेच्या एटीएममधून एका दिवसात चाळीस हजारांपर्यंतची रक्कम काढता येते. त्याचबरोबर या बँकेत खाते सुरू केल्यास तुम्हाला बँकेकडून दोन लाखांपर्यंतचा अपघाती विमादेखील मिळतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button