TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

रवींद्र धंगेकरबद्दल एका छुपी सहानुभूती नागरिकांमध्ये होती… कसब्यातील विजयाचं श्रेय कुणाचं? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं खरं कारण…

मुंबईः ‘चिंचवडमध्ये पराभव झाला हे मान्य केलं पाहिजे. आज देशात तीन राज्यात निवडणुका झाल्या काँग्रेस शून्य आहे. एक काळ असा होता तिथे फक्त काँग्रेसच होती. आजचा निकाल शून्य आहे काँग्रेसचा. एक कसबा पेठ निवडणूक जिंकली म्हणजे खूप जिंकलो, असं ते म्हणतात. पण ते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. पण देशात काँग्रेसची आज काय परिस्थिती आहे. आज काँग्रेस देशातून पूर्ण साफ झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर कसब्यातील विजयाचं खरं श्रेय कोणाचं आहे? खरं श्रेय हे तिथल्या उमेदवाराचं आहे. तो उमेदवार आधीपासूनच सक्रिय आहे. कसब्यातला जो विजय आहे, याचं थोडं विश्लेषण केलं तर तिथे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरबद्दल एका छुपी सहानुभूती नागरिकांमध्ये होती. कारण ते अनेक वेळा निवडणुकीत पराभूत झाले होते. धंगेकर हे दोन तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढले आहेत. पण हेमंत रासने हे पहिल्यांदा लढले आहेत. आणि त्यामुळे थोडी सहानुभूती धंगेकरांच्या बाजूने होती. ही काही महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हती. धंगेकरांच्या बाजूने सहानुभूती होती. मी तिथे चार पाच दिवस होतो. एकदा निवडणुकीत पराभव झाल्यावर थोडी सहानुभूती मिळते. त्याचाही फायदा धंगेकरांना झाला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. प्रचार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी धंगेकरांनी उपोषण केलं. हे उपोषण म्हणजे पुन्हा प्रचार करण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी केलं आहे. त्यातून त्यांना सहानुभूती मिळाली आहे, आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे बघावं लागेल’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

गेल्या २८ वर्षांत त्या त्या निवडणुकीवेळी त्या त्या वेळचं समीकरण पाहता जिंकणं किवा पराभव होणं हे ठरत असतं. यावेळी कसब्यात जो पराभव झाला आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याचं विश्लेषणही करणार आहोत. कुठे आम्ही कमी पडलो आणि काय सुधारणा करण्याची गरज आहे, यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि आम्ही करू, असं बावनकुळे म्हणाले.

कसब्यात भाजपने धनशक्तीचा वापर केला असा होतोय आणि जनशक्तीने भाजपला नाकारलं, असं बोललं जातंय? या प्रश्नावर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, आमची ही परंपरा नाही. आम्ही एक संस्काराने निवडणूक पद्धतीने निवडणूक लढवणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही पैशाचा वापर करून कधीच निवडणूक लढल्या नाहीत. आमच्या आयुष्यात तो धर्मही नाही आणि स्वभावही नाही, असं उत्तर देत बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.

कसब्यात मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं त्यामुळे धंगेकरांचा विजय झाला असा दावा अजित पवारांनी केलाय. मनसेने कुठेतरी छुपी मदत काँग्रेसला केली आहे का? यावरही बावनकुळे बोलले. राज ठाकरे यांच्या मनसेने निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. आम्ही त्यांचे आभार मानतो. ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राज साहेबांचं आवाहन ऐकलं नाही, त्यांना राज ठाकरेंनी पक्षातून काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिका काहीच शंका नाही. स्थानिक पातळीवर उमेदवारासोबत मनसेचे काही कार्यकर्ते जुळलेले होते. त्यांनी धंगेकरांचं काम केलं. आणि त्यामुळे अजित पवार हे बोलले असतील, असं बावनकुळेंनी सांगितलं.

‘कसब्याच्या पराभवाचं चिंतन करतोय’
विधान परिषद निवडणुका असतील किंवा आताची पोटनिवडणूक भाजपला पूर्ण यश मिळत नाहीए, याचा मागचं काय कारण आहे? असा सवाल बावनकुळेंना करण्यात आला. कोकणमध्ये आमचं काय होतं? पण कोकण आम्ही जिंकली. नागपूर तर आम्ही लढतच नव्हतो. नागपूर ही शिक्षक परिषद लढते. त्यांना आम्ही पाठिंबा देतो. मागच्यावेळी दहा वर्षे शिक्षक परिषद जिंकली. यावेळी त्यांनी पुन्हा उमेदवार उभा केला आणि ते पराभूत झाले. त्यामुळे भाजप पक्षाची ती जागा नव्हती ती शिक्षक परिषदेची होती. कोकणमध्ये आमची जागा नव्हती ती निवडून आली. हा अमरावतीमधला एक पराभव आम्हाला मान्य आहे. आम्ही जसं कसब्याच्या पराभवाचं चिंतन करतोय, तसंच आम्हाला अमरावतीचं करावं लागणार आहे. याशिवाय भाजपचा कुठेही पराभव झाला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत ३००३ सरपंचपदाच्या निवडणुका जिंकलो. त्यामुळे एखाद्या निवडणुकीचं जे समीकरण आहे, त्यावरून सर्वच बिघडलं आहे असा अंदाज बांधता येत नाही. त्यात निवडणुकीत तेथील वातावरण, परिस्थिती आणि उमेदवार यावर निकाल अवलंबून आहे. कुठल्या निवडणुकीचं काय समीकरण होईल, हा अंदाज लावता येत नाही. पोटनिवडणुकीत आम्ही दोन्ही जागा जिंकल्या असत्या तर संपूर्ण महाराष्ट्र आम्ही जिंकू असं होत नाही. यावेळी आम्ही लढलोय आणि तिथे पराभव झालाय. हा पराभव काशामुळे याचा आम्ही बुथनुसार आणि प्रभागानुसार माहिती घेणार आहोत, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button