पिंपरी / चिंचवड

टेम्पो मधून साडेआठ लाखांच्या बॅटर्‍यांची चोरी

पिंपरी | प्रतिनिधी

टेम्पोमध्ये भरून ठेवलेल्या 8 लाख 64 हजार रुपये किमतीच्या तब्बल 235 बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. 12) पहाटे तीन वाजताच्या सुमारास रानजाई हॉटेल समोर चिंचवड येथे उघडकीस आली.

मूलचंद मेवालाल प्रजापती (वय 47, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या  टेम्पो मध्ये आठ लाख 64 हजार 810 रुपये किमतीच्या 235 बॅटरी भरल्या. त्यानंतर टेम्पो चिंचवड येथील रानजाई हॉटेलच्या समोर विरुद्ध बाजूला पार्क केला. सोमवारी रात्री पावणे दहा ते मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी टेम्पोची ताडपत्री फोडून टेम्पोमधून सर्व बॅट-यि चोरून नेल्या. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button