पिंपरी / चिंचवड

मित्राला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून फोन हिसकावला

पिंपरी l प्रतिनिधी

मित्राला घेण्यासाठी देहूरोड येथून हिंजवडीला निघालेल्या तरुणाचा आयफोन तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावला. ही घटना गुरुवारी (दि. 12) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास शिंदे पेट्रोल पंपाजवळ देहूरोड येथे घडली.

आकाश शंकर परिटकर (वय 23, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश हे त्यांच्या दुचाकीवरून त्यांचा मित्र साहिल सय्यद याला घेण्यासाठी देहूरोड येथून हिंजवडी येथे जात होते. वाटेत त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी दुचाकी शिंदे पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेली. आकाश हे दुचाकी ढकलत पेट्रोल पंपाजवळ आले असता एका मोपेड दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून आकाश यांच्या खिशातून 40 हजार रुपये किमतीचा आयफोन जबरदस्तीने काढून चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button