breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केदारनाथ धाम यात्रेसाठी जगातील सर्वात लांब रोपवे बांधणार

डेहराडून | टीम ऑनलाइन
केदारनाथ धाम यात्रा भाविकांसाठी जगातील सर्वात लांब रोपवेचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तराखंड सरकारने जोरदार काम सुरू केले आहे. केदारनाथ धाममध्ये 11.5 किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे. सध्या जगातील सर्वात लांब रोपवे मेक्सिको सिटीमध्ये आहे, ज्याला केबल बस 2 म्हणून ओळखले जाते. त्याची लांबी 10.55 किमी आहे. केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे भाविकांची यात्रा अधिक सहज होणार आहे.

समुद्रसपाटीपासून 11,500 फूट उंचीवर उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाम यात्रेसाठी सध्या भाविकांना गौरीकुंड ते केदारनाथ धाम असा 16 किमीचा प्रवास करावा लागतो, ज्यासाठी संपूर्ण दिवस जातो. मात्र सोनप्रयाग ते केदारनाथ असा रोपवे बांधण्यात आल्याने हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. या रोपवेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ भेटीदरम्यान केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये लवकरच रोपवेचे काम सुरू होईल, असे जाहीर केले होते. आता याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी एका अहवालात असे म्हटले आहे की, केदारनाथ रोपवे प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. या रोपवेबाबत पूर्वी गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत हा प्रकल्प बांधण्यात यावा अशी योजना होती. परंतु अहवालानुसार नंतर हा प्रकल्प गौरीकुंडऐवजी सोनप्रयाग येथून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना त्याचा लाभ घेता येईल.

धामकडे जाण्यासाठी 16 किमीचा ट्रेकिंग मार्ग गौरीकुंडपासून सुरू होतो, तर सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर वाहनाने 8 किमी आहे. एकूण सोनप्रयाग ते धाम सुमारे 25 किलोमीटर पायी किंवा वाहनाने जावे लागते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button