पिंपरी / चिंचवड
कामगाराने चोरले नऊ तोळे सोन्याचे दागिने
पिंपरी l प्रतिनिधी
घरात काम करणा-या कामगाराने घरातून नऊ तोळे वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत साने चौक, चिखली येथे घडली.
अमित भागवतराव कणसे (वय 38, रा. साने चौक, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय 27, रा. लक्ष्मी पेठ, उत्तर सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे आरोपी शिवाजी खंडागळे हा काम करत होता. त्याने फिर्यादी यांच्या घरातील कपाटाचे लॉक उघडून कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे नऊ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.