पिंपरी / चिंचवड

महिलेने खेळाडू असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून मिळवली नोकरी

पिंपरी l प्रतिनिधी 
खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून महावितरणमध्ये नोकरी मिळवली. याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 ऑक्‍टोबर 2021 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये पिंपरीतील महावितरणच्या कार्यालयात घडली.

रशिका दिलीप रोमन (वय 34, रा. कात्रज, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लग्नापूर्वी बुलढाणा आणि लग्नानंतर जळगाव येथे राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी हिने खेळाडू आरक्षणाबाबत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती यांच्याकडील स्वतःच्या नावाने पडताळणी प्रमाणपत्र आणि फॉर्म नंबर 3 असे दोन्ही बनावट दस्तऐवज तयार केले. या दस्तऐवजाच्या आधारे तिने खेळाडू आरक्षणामधून महावितरणच्या कार्यालयात विद्युत सहायक या पदावर नोकरी मिळवली. तसेच महावितरण आणि शासनाची फसवणूक केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button