धुलीवंदन साजरे करून घरी निघालेल्या दोघांना रस्त्यात अडवून मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
धुलीवंदन साजरे करून कार मधून घरी जात असलेल्या दोघांना रस्त्यात अडवून तिघांनी मिळून काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी सात वाजता आंबेठाण चौक येथे घडली.
सचिन मोतीरामजी बोराडे (वय 32, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची पत्नी प्रिया बोराडे, नितीन नागदेवे आणि स्वराज नागदेवे असे चौघेजण मित्रांकडे धुलीवंदन साजरे करून कार मधून घरी जात होते. ते आंबेठाण चौक येथे आले असता एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी दुचाकी फिर्यादी यांच्या कारला आडवी लावली आणि फिर्यादी यांना खाली उतरवले. विनाकारण तिघांनी फिर्यादी यांना काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे भांडण सोडविण्यासाठी आलेले नितीन नागदेवे यांना देखील आरोपींनी मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.