पिंपरी / चिंचवड

एच पी चौकात दोन तृतीयपंथीयांनी ट्रक चालकाला लुटले

पिंपरी | प्रतिनिधी

एचपी चौक महाळुंगे येथे दोन तृतीयपंथीयांनी एका तरुणासोबत हुज्जत घालून त्याला लुटले. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री आठ वाजता घडली. पोलिसांनी दोन्ही तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

राधेश्याम देवराव चव्हाण (वय 22, रा. कुरुळी फाटा, ता. खेड), निक्कु सुभाषराव सोनवणे (वय 22, रा. तुपेवस्ती, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्र थापा मगर (वय 23, रा. खालूम्बरे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंटेनर चालक आहे. ते महिंद्रा कंपनीतून कंपनीचा माल खाली करून परत कंपनीत जात होते. ते एच पी चौक महाळुंगे येथे आले असता त्यांनी कंटेनर रस्त्याच्या बाजूला पार्क केला आणि लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी फिर्यादीजवळ दोन किन्नर आले. त्यांनी टाळ्या वाजवून फिर्यादीसोबत हुज्जत घातली. त्यांनतर फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून तीन हजार रुपये बळजबरीने काढून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button