TOP Newsताज्या घडामोडीपुणे

ओमायक्रॉनचा धोका वाढला, ख्रिसमससाठी महापालिकेची नवीन नियमावली

पुणे | पुण्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे 13 रुग्ण आढळले आहेत. यातील सात रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहरात, तीन पुणे शहरात तर ग्रामीण भागात तीन रुग्ण. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. अशावेळी येऊ घातलेल्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सणाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आवाहन

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सण साधापणाने साजरा करा

:- चर्च आणि इतर ठिकाणी गर्दी करु नका.

:- चर्चमध्ये प्रार्थनेसाठी केवळ 50 टक्के उपस्थिती बंधनकारक

:- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा.

:- चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आयसह अन्य सजावट केल्यास गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करा

:- चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावण्यास बंदी

:- मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी

राज्यात आज 23 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आढलून आलेल्या 23 नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 88 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button