पिंपरी / चिंचवड

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने मारला हजारोंच्या दागिन्यांवर डल्ला

पिंपरी | प्रतिनिधी

घराला कुलूप लावून कुटुंबातील सर्वजण मूळ गावी गेले असता त्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात चोरट्यांनी 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी सहा वाजता देहूगावात जैन मंदिराजवळ घडली.

अजित जालिंदर डोंगरे (वय 33, रा. जैन मंदिराजवळ, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी सातारा येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे देहूगाव येथील घर कुलूप लावून बंद होते. रविवारी सायंकाळी सहा वाजता अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाटातून 52 हजार रुपये किमतीचे 11.980 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button