breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

हवेचा दाब वाढून ऑगस्टमध्ये राज्यात पावसाचा जोर ओसरणार

औरंगाबाद – राज्यात येत्या दोन ऑगस्टपासून हवेचा दाब वाढण्याचे संकेत आहेत. सध्या राज्याच्या उत्तरेकडे १००२ तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब असून २ ऑगस्टपासून उत्तर भागातील दाब १००४ तर दक्षिण भागावरील दाब १००६ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ढगाळ हवामान राहील, तर पावसाचा जोर ओसरून पावसाचे प्रमाण अल्प राहणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच ऑगस्टमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसात तूट वाढण्याची शक्यता आहे.राज्यात यंदा ३० जुलैनंतर अपेक्षित पावसाच्या तुलनेत २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

असे असले तरी उत्तर महाराष्ट्रातील तीन आणि विदर्भातील पाच जिल्ह्यात मात्र पावसाची मोठी तूट दिसत आहे.तर राज्यातील अनेक धरणांत गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्के जादा पाणीसाठा असल्याची माहिती डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button