breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक सुरक्षा विभागाने भोसरी आणि निगडी मध्ये साडेचार लाखांचा गुटखा पकडला

पिंपरी – सामाजिक सुरक्षा विभागाने भोसरी येथे दोन तर निगडी येथे एक कारवाई करत चार लाख 54 हजारांचा गुटखा पकडला आहे. तीन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण सहा लाख 55 हजार 801 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

फुगे चाळ भोसरी येथे पहिली कारवाई केली. गिता प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात शारदा गजानन रहाणे या महिलेने प्रतिबंधीत तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. पोलिसांनी दुकानातून 39 हजार 116 रुपयांचा गुटखा, 2400 रुपये रोख रक्कम असा एकूण 41 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महिलेच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांडगे वस्ती, भोसरी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई केली. लांडगे वस्ती येथे अभिजीत उर्फ पप्पू भोर हा प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्यासाठी कार मधून नेताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी गुटखा नवनाथ लांडगे याच्या रुममध्ये ठेवल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 600 रुपयांचा गुटखा आणि एक लाख 20 हजार रुपयांची कार असा एकूण 2 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अभिजित आणि नवनाथ या दोघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button