TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे देणेघेणे नाही – आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे | सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे देणेघेणे नाही. आतापर्यंत 35 कोटी 88 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. परंतु त्यामधील एकही काम सुरु केलेले नाही.सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नाही.जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी कामे करा, असा टोला आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांना लगावला.आमदार सुनिल शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील विकास कामांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ‘सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि बैठक बोलावणारे गटनेते अरुण भेगडे आणि त्यांचे सर्व सदस्य पुन्हा लपून बसले. हे का लपून बसलेत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

यावेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने नगरसेविका वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, मंगल भेगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, मुख्याधिकारी सतीश दिघे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तालुका कोविड समन्वयक डॉ गुणेश बागडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ, व नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके म्हणाले, “अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर करावे. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.ऐतिहासिक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची इमारत नव्याने उभी करायची आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्या कामांसाठी मान्यता द्यावी. नगरोत्थान, डीपीडीसीच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात नगरपरिषदेने शहरातील महत्वाच्या कामांचे ठराव करून द्यावेत, ज्यामुळे नगरपरिषदेला 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता येईल.”असे शेळके म्हणाले.

यावेळी आमदार शेळके यांनी नगरपरिषदेच्या चालु असलेल्या कामाचा आढावा घेतला.त्यामध्ये भुयारी गटार, पाणी योजना, तळेगाव-चाकण रस्ता रुंदीकरणात येणारे विजेचे खांब, रस्त्यावर बसणारे व्यावसायिक, नवीन नगरपरिषद इमारत, आंद्रा धरणातून तळेगावसाठी पाणी आणणे, तळेगाव स्टेशन भागात नवीन गॅसदाहिनी, डोळसनाथ महाराज सभामंडप व येत्या शुक्रवारी तळेगाव दाभाडे शहरात महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत चर्चा यावेळी झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button