TOP Newsपुणेमहाराष्ट्र

स्त्री-पुरुष डॉक्टरांचे प्रमाण समान व्हावे. : डॉ. शां.ब.मुजुमदार

पुणे : नेत्रशल्य चिकित्सा , नेत्रोपचार क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवी योगदानाबद्दल ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक तज्ज्ञ , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आला. पी.वाय.सी.जीमखाना येथे शनीवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. सौ. संजिवनी मुजुमदार, सौ.अरुणाताई केळकर, डॉ.आदित्य केळकर,सुधीर गाडगीळ, डॉ.जाई केळकर , डॉ.परवेझ ग्रँट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी धन्वंतरी पूजन करण्यात आले.

डॉ. राजीव देशमुख यांनी डॉ. श्रीकांत केळकर यांची मुलाखत घेतली.केळकर यांच्या वैद्यकीय, कला, सामाजिक, क्षेत्रातील योगदानाचे पैलू या मुलाखतीतून उलगडले. ज्येष्ठ संग्राहक दिनकर केळकरांचे पुतणे, डॉ. भास्कर केळकरांचे पुत्र, के.ई.एम. चे विभाग प्रमुख, रोटेरियन, विविध वाद्यांचे वादक, उत्तम छायाचित्रकार , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी चे संस्थापक अशा विविध रूपातील त्यांचे कर्तुत्व उपस्थितांना समजले.

‘पुण्यात सर्वप्रथम लेसर शस्त्रक्रिया सुरु करण्यामागे मुंबई पेक्षा अद्ययावत असण्याची प्रेरणा होती. दिनकर काका केळकर, डॉ. भास्कर केळकर यांच्या ध्यासातून मी प्रेरणा घेतली ‘, असे डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले. डॉ. मंदार परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. ‘व्यवसायाचे संतुलन साधत आम्ही एकमेकांच्या कलागुणाना पाठिंबा दिला ‘, असे सौ. अरुणा केळकर यांनी सांगितले.डॉ.संजय गुप्ते, डॉ. अस्मिता गुप्ते, डॉ.परवेझ ग्रँट, डॉ.संजय पाटील, डॉ.हेमंत वाकणकर, ब्रिगेडियर डॉ. माधव पेठे यांच्यासह शहरातील मान्यवर वैद्यकीय व्यावसायिकांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले, ‘एका पेशातील व्यक्ती दुसऱ्यांचा सत्कार करत नाही. मत्सर केला जातो. पण स्वतःच्या सत्कार समारंभात हा डॉ.केळकर यांनी अन्य कर्तृत्ववान वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार केला, हा त्यांचा मोठेपणा आहे. क्लिनिक वर न थांबता संस्था काढण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, हे कौतुकास्पद आहे.केळकर घराणे हे संवेदनशील घराणे आहे.ती संवेदनशीलता पुढील पिढयांमध्ये आली आहे ‘.

कोणतेही कॉलेज काढणे ठीक असते, पण कौन्सिलच्या कारभारामुळे आम्ही मेडिकल कॉलेज काढले नाही. पण, आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणेने मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय काढले. स्त्री -पुरुष डॉक्टरांचे प्रमाण समान व्हावे, अशी आमची इच्छा आहे. पुण्यात श्रेष्ठ आणि परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे, हि अभिमानास्पद बाब आहे. पुण्यातील डॉक्टर त्यासाठी कौतुकास पात्र आहेत ‘, असेही डॉ. मुजुमदार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button