TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

पंतप्रधानांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे अनावरण

पुणे | श्री रामानुज आचार्य हे 11 व्या शतकातील भक्ति मार्गातील संत असून त्यांच्या 216 फूटी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे अनावरण करण्यात येणार हा बैठकीच्या मुद्रेतील जगातील दुसरा सर्वात मोठा पुतळा असेल. तर राष्ट्रपती श्री रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2022 रोजी रामानुज पुतळ्याच्या अंतर्गत 120 किलो सुवर्णजडीत खोलीचे अनावरण होणार आहे. तर पंतप्रधानांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे अनावरण होईल.शमशाबाद, हैदराबाद, तेलंगणा येथे 45 एकर जागेवर हा स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी उभारण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2022 रोजी 120 किलो सुवर्ण रामानुज पुतळ्याच्या अंतर्गत खोलीचे अनावरण करण्यात येणार आहे.

या अनावरण सोहळ्यासह 1035 यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या आधुनिक युगात आध्यात्मिक आयोजनाचा भाग असून त्यासोबतच श्री रामानुज सहस्त्राब्धी ‘समारोह’ दरम्यान महा मंत्र पठण करण्यात येईल. यंदा या महान संतांचे 1000 वे जयंती वर्ष साजरे होते आहे. 2 फेब्रुवारी 2022 पासून सोहळ्याची सुरुवात होईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे एचएच चिन्ना जियार स्वामी यांच्या समवेत कार्यक्रमाचे सह-यजमान आहेत. काही अन्य मुख्यमंत्री, राजकारणी, सेलेब्रिटी आणि अभिनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हा 1000-कोटी रुपयांचा प्रकल्प जगभरातील भक्तांनी दिलेल्या दानावर बांधलेला आहे. या महान संताच्या पृथ्वीवरील आगमनाची 120 वर्षे साजरी करण्याच्या उद्देशाने श्री रामानुजाचार्याच्या गर्भगृहात 120 किलो सोन्याचा वापर करण्यात आला. बाहेरील 216 फूटी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी हा जगातील दुसरा सर्वाधिक उंच पुतळा असून तो बैठ्या मुद्रेत साकरलेला आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झींक अशा पंचधातूनी ही मूर्ती घडवण्यात आली. बांधकामात 108 दिव्य देसमच्या प्रतिकृतीसह तामीळ संत अलवारस यांच्या कार्यात नमूद विष्णू मंदिराचे 108 नमुने कोरलेले आहेत.

श्री पेरूमबूदूर, तामिळनाडू येथे 1017 मध्ये जन्माला आलेल्या श्री रामानुजाचार्य यांनी मूलभूत विचारांची सांगड घालत सामाजिक, सांस्कृतिक, लिंग-आधारीत, शैक्षणिक आणि आर्थिक भेदभाव दूर सारत राष्ट्रीय, लिंग, वंश, जात, पंथांची जोघडे दूर सारली. प्रत्येक मानवाच्या मनात समानता रुजवण्याचा प्रयत्न केला. समाजातील असमानतेला कारणीभूत असलेल्या देवालयांची दारे सर्वांसाठी खुली केली. जगभरातील समाज सुधारकांकरिता ते सर्वधर्म समभावाचे कालातीत मूर्तिमंत उदाहरण ठरले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button