breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना; राज्यपालांचे सरकारला पत्र

मुंबई | प्रतिनिधी 
विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असून आता अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काय निर्णय़ होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सातत्यानं राज्यपालांशी संवाद साधण्यात आला. त्यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी आता अध्यक्षाची निवड ही घटनाबाह्य असल्याचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांनी लिफाफाबंद पत्र पाठवलं आहे. राज्यपालांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

राज्य सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यपालांची परवानगी नसताना निवडणूक घेणं अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे राज्यपालांनी परवानगी दिल्यास निवडणूक घेता येऊ शकते. सध्या तरी अशी काही चिन्हे दिसत नाही. नियमांच्या बदलाचा प्रश्नही अनुत्तरीत आहेत. राज्यपालांच्या उत्तरात नेमकं काय आहे हे समजल्यानंतरच पुढं काय हे स्पष्ट होणार आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षभर अध्यक्षपद रिक्त आहे. नियम बदलून आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध दर्शवला. तर २७,२८ डिसेंबरला निवडणूक घेण्याचा कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्यपलांकडे पाठवण्यात आला. मात्र निवडणुकीत आवाजी मतदान घटननाबाह्य असल्याचं उत्तर राज्यपालांनी दिलं. राज्यपालांनी परवानगी न दिल्यानं सरकारने पत्र पाठवलं, दरम्यान, राज्यपालांनी आता त्या पत्राला उत्तर पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष निवड कऱण्यावर ठाम आहे तर राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड कशी होणार याचीच चर्चा सध्या होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button