पिंपरी / चिंचवड

पिंपरीत पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी मधील उद्यमनगर येथे एका पादचारी महिलेचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.

सुनीता बाळासाहेब बनसोडे (वय 38, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उद्यमनगर पिंपरी येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button