breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत ओमिक्रोन संशयित रुग्णांची संख्या वाढली!

मुंबई – मुंबईत ओमिक्रोन संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे, आणखी दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मुंबईतील ओमिक्रोन संशयितांची एकूण संख्या १४ वर पोहचली आहे. यात १० परदेशी तर ४ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सापडलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात आता ओमिक्रोन संशयितांची संख्या ही ३० वर पोहचली आहे.

या सर्वांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबईत २ डिसेंबरपर्यंत ३१३६ परदेशी प्रवासी उच्च जोखमीच्या देशांतून आले आहेत, त्यापैकी २१४९ लोकांची चाचणी करण्यात आली यात परदेशातील११ लोक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या प्रवाशांपैकी ११ पैकी एक प्रवासी मुंबईबाहेरचा आहे. परदेशातून आलेल्यांपैकी लंडनमधून परतलेल्या ५ जणांचा, एक मॉरिशस, एक जर्मनी,एक दक्षिण आफ्रिका, एक पोर्तुगाल, एक पॅरिस आणि एक स्पेनच्या प्रवाशाचा समावेश आहे.बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button