breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35,78,160 वर

  • मुंबईत 9,925, पुण्यात 7,888 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात बुधवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 58,952 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 39,624 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 35,78,160 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 58,804 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 29,05,721 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,12,070 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 9,925 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 54 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 9,273 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 5,44,942 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,140 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 4,44,214 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे आणि सध्या 87,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 7,888 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,76,014 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 94 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 10,989 इतका झाला आहे. दरम्यान, पुण्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 4,206 पुणे शहरातील, तर 1,517 पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button