breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 32,29,547 वर

  • मुंबईत 8,938, पुण्यात 12,059 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 56,286 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 376 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 36,130 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 32,29,547 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 57,028 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 26,49,757 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,21,317 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 8,938 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 4,503 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 4,91,698 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,874 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,92,514 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तसेच पुणे जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 12,059 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,19,091 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 46 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 8,583 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 5,13,266 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 97,242 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button