breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,79,185 वर

  • मुंबईत 1,121, पुण्यात 1,696 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 9 हजार 855 नवे कोरोनाबाधित आढळले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 79 हजार 185 वर पोहोचली आहे. तसेच काल 42 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. याचबरोबर 6 हजार 559 जण कोरोनातून बरेदेखील झाले. यासह राज्यात आजपर्यंत 52 हजार 280 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 20 लाख 43 हजार 349 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 734 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3 लाख 28 हजार 740 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 482 जणांनी आपला जीव गमावला असून 3 लाख 06 हजार 373 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 10 हजार 010 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात मंगळवारी 1 हजार 696 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 13 हजार 000 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार119 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 3 लाख 89 हजार 000 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 16 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button