breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर

  • मुंबईत 10,428, पुण्यात 10,907 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात बुधवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 59,907 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 30,296 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 56,652 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 26,13,627 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,01,559 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 10,428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 6,007 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 4,82,760 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,851 इतका झाला आहे, तर सध्या 81,886 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 10,907 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,04,037 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 62 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 10,402 इतका झाला आहे. तसेच काल 7,832 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 5,09,278 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 84,526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button