breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,69,330 वर

  • मुंबईत 859, पुण्यात 1,211 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 7 हजार 863 नवे कोरोनाबाधित आढळले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 69 हजार 330 वर पोहोचली आहे. तसेच काल 54 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. याचबरोबर 6 हजार 332 जण कोरोनातून बरेदेखील झाले. यासह राज्यात आजपर्यंत 52 हजार 238 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 20 लाख 36 हजार 790 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 79 हजार 093 आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 859 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 903 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3 लाख 27 हजार 619 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 476 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर सध्या 9 हजार 633 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात मंगळवारी 1 हजार 211 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच 987 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 10 हजार 129 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 258 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 3 लाख 90 हजार 473 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button