Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा खून, पोस्टमार्टेमनंतर झाला उलगडा

पुणे | लोणी – काळभोर परिसरात एका 23 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी ( दि. 20 ) हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील आरोपी अज्ञात असून, त्यांचा शोध लोणी – काळभोर पोलीस घेत आहेत.विजय उर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय 23) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी – काळभोर पोलीस ठाण्यात विजयचा भाऊ रोहित मोरे (वय 25) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, पुण्यातील लोणी – काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक 23 वर्षीय युवक बेशुद्धावस्थेत सापडला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती त्याचा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचा डॉक्टरने सांगितले. शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मयत विजय उर्फ गुलशन मोरे हा लोणी काळभोर परिसरातील पाषाणकरबाग येथे राहत होता. विजयला दारूचे व्यसन होते. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करायचा. रविवारी रात्री तो घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. त्यानंतर त्याच्या भावाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्धावस्थेत सापडला होता. दरम्यान त्याचा खून कोणी आणि का केला त्याचा मात्र अद्याप उलगडा झाला नाही. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button