ताज्या घडामोडीपुणे

राडारोडा कुठे टाकला याची माहिती पालिकेला द्यावी लागणार

पुणे | शहरातील विविध भागांत महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे करताना बांधकम पाडले जाते किंवा खोदकाम केले जाते. पण, हा राडारोडा संबंधित ठेकेदार कोठे टाकतात, याची माहिती पालिका प्रशासनाला नसते. अनेकदा ठेकेदार राडारोडा, नदी,नाला आणि खाणीत टाकले जाते त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे राडारोड्याची विल्हेवाट कुठे लावली, याचा हिशेब ठेकेदारास देणे बंधनकारक केले जाणार आहे.महापालिकेने वाघोली येथे सिमेंट काँक्रीटच्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला आहे. पण, तेथे अपेक्षेपेक्षा कमी राडारोडा टाकला जात आहे. नदीपात्र, नदीच्या कडेच्या खासगी जागा, टेकड्या या ठिकाणी राडारोडा टाकणे बंद व्हावे, यासाठी धोरण तयार केले जात आहे. महापालिकेच्या रस्ते, पदपथ दुरुस्ती, जलवाहिन्या टाकणे, स्वच्छतागृह बांधणे

आणि पाडणे, सांडपाणी वाहिनी, नवीन इमारती अशी सुमारे दरवर्षी अडीच हजार कोटींची कामे केली जातात. ठेकेदारांकडून हा राडारोडा पालिकेचे काम असल्याचे सांगत रस्त्यावर, नदीपात्रात टाकतात. राडारोडा योग्य ठिकाणी टाकायची जबाबदारी असतान त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे आता ठेकेदारांना कामात किती राडारोडा निघाला, त्याची व्हिल्हेवाट कुठे लावली याची माहिती पालिकेला द्यावी लागेल. त्यानंतरच बिल काढले जाणार आहे

महापालिका नदी, नाल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे यापुढे हा राडारोडा कुठे टाकला, याची माहिती ठेकेदाराला द्यावी लागेलच. त्यानंतर बिल काढले जाईल. लवकरच असा नियम बंधनकारक केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button