breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एक्झर्बिया अॅबोड सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी जांभुळगाव येथील ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळाचा सुरेल कार्यक्रम उत्साहात

वडगाव (मावळ) । पुणे । । महान्यूज । गणेश क्षिरसागर ।

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा, ज्ञानाचा अधिपती बाप्पा गणराजाचे बुधवार दिनांक 31 रोजी थाटामाटात आगमन झाले. मावळ तालुक्यातील वडगाव जांभुळ येथील एक्सर्बिया अॅबोड या सोसायटीच्या गणेशोत्सवाला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण म्हणजे गणेशोत्सवानिमित्त एक्झर्बिया अॅबोड, जांभुळ सोसायटीच्या वतीने 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जांभुळगाव येथील ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळाचा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. ज्ञानेश्वरी भजन मंडळ जांभुळगावच्या सर्वेसर्वा अलकाताई नवघणे, रंजना काकरे तसेच भरत जांभुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 महिलांच्या सहभागाने सुरेल भजनाचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. भजनी मंडळाने मध्यांतरामध्ये गणेश आरतीचेदेखील उत्कृष्ट गायन केले. यावेळी पत्रकार सुनील आढाव यांच्या हस्ते भजनी मंडळाचा श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी एक्झर्बिया अॅबोड मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, मार्गदर्शक सतिश कदम, प्रसन्न शिरोडकर, सचिन कासार, प्रकाश कांबळे, कार्यक्रमाचे प्रयोजक विशाल गोडसे, युवराज कदम, सल्लागार सचिन शिंदे, अमोल दिसले, सचिव दिनेश सकट, सहसचिव सत्यवान वाळुंज, कार्यवाहक गणेश क्षिरसागर, सचिन कुंभार, सुनील पवार, कृष्णा लोखंडे, चंद्रशेखर शर्मा, सुमीत पुरी, सागर माळकर, नीलेश परदेशी, बाळासाहेब लभडे, सोहेल शेख, रविंद्र उतेकर, पुंजाजी ससाणे, शरद सातपुते, रविंद्र जाधव, राजेश सोळंकी, पियुष पाटील, अजित गोळराखे, माध्यम प्रतिनिधी सार्थक कुंभार, ओम हिंगे, सुधांशु अनेच्छा, आदित्य कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

रहिवाशांनी मतभेद दूर ठेऊन गणेशोत्सवात सहभागी व्हावे

मंडळाचे मार्गदर्शक सतिश कदम म्हणाले की, सोसायटीमधील सर्वच रहिवाशांनी मतभेद दूर ठेऊन गणेशोत्सवात सहभागी व्हावे. हिंदु धर्मियांचा सर्वात मोठा असलेला हा उत्सव वर्षातून एकदाच येत असतो. यामध्ये मनभेद आणि मतभेद नकोत. सोसायटीमधील नागरिकांनी एकाेप्याने स्वेच्छेने निर्विवादपणे या उत्सवात सहभागी व्हावे. जेणेकरून उत्सवाला भव्य-दिव्य स्वरुप प्राप्त होईल. सोसायटीमधील रहिवसांचाएकोपा व्हावा हा स्वच्छ हेतू समोऱ ठेऊन ज्या आयोजकांनी गणेशोत्सवाचे आयोजन केलेले आहे. त्यांच्या मेहनतीचे देखील कदम यांनी यावेळी कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button