आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

दुसऱ्या कोरोना लाटेनंतरची सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या

पुणे | भारतात गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 466 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 11 हजार 961 कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 39 हजार 683 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या कोरोना लाटेनंतरची ही सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 43 लाख 88 हजार 579 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 37 लाख 87 हजार 047 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.25 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 460 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 61 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात आजवर 61 कोटी 85 लाख 82 हजार 659 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 12 लाख 78 हजार 728 नमूने तपासण्यात आले आहेत.कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 109 कोटी 63 लाख 59 हजार 208 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 52 लाख 69 हजार 137 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button