ताज्या घडामोडीपुणे

‘अकौंटन्सी’चा प्रवास संग्रहालयबद्ध, पुण्यात पाच महाविद्यालयात ‘अकौंटन्सी म्युझियम’

पुणे | प्राचीन काळापासून व्यवहाराच्या पद्धती, अकौन्टन्सीमधील कालानुरूप बदल, जुनी नाणी, चलन, पदके, जुने ताळेबंद, धनादेश, खातेपुस्तिका असा अकौंन्टन्सीशी संबंधित अनेक गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. सनदी लेखापालांची नियामक संस्था इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) पुणे शाखेने शहरातील पाच महाविद्यालयांत अकौन्टन्सी म्युझियम’ उभारले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन नुकतेच झाले.यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पाठारे, अमृता कुलकर्णी, माजी अध्यक्ष अभिषेक धामणे आदींसह संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

‘आयसीएआय’च्या पुणे शाखेतर्फे पश्चिम विभागीय समितीच्या (डब्ल्यूआयआरसी)पुढाकारातून नेस वाडिया कॉलेज, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या पाच महाविद्यालयांत ही संग्रहालये उभारण्यात आली आहेत.‘विद्यार्थ्यांच्या व सनदी लेखापालांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवोपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयांमध्ये ‘अकौंटन्सी म्युझियम’ स्थापन करण्यात येत आहे. मुख्य ‘अकौंटन्सी म्युझियम’ नोयडा येथील आयसीएआय भवनमध्ये आहे.’ असे सीए समीर लड्डा म्हणाले

काय पाहाल ‘अकौंटन्सी म्युझियम’मध्ये –

प्राचीन काळापासून आजपर्यंत अकौन्टसीमध्ये होत गेलेली प्रगती, व्यवहाराच्या बदलत्या पद्धती, विकसित होत गेलेल्या प्रणाली, जुन्या काळातील हस्तलिखिते, शिल्पे, जगभरातील संग्रहालयांमध्ये साठवलेल्या कलाकृतींची छायाचित्रे, महत्त्वाची जर्नल्स, नाणी, पदके, पहिल्या अकाउंटन्सीच्या प्रतिमा, जुने ताळेबंद इत्यादि या म्युझियममध्ये पाहायला मिळणार आहे.

सुमेरियन, हडप्पा संस्कृतीच्या काळातील चलने, पहिले भारतीय नाणे, मोहरा, हस्तलिखित धनादेश, खातेपुस्तक, मुनीमची परंपरा आदी गोष्टींचा यात समावेश असून, नव्या पिढीला अकौंटसीबद्दल माहिती व्हावी, गोडी लागावी व अकाउंटचा इतिहास, व्यवहाराच्या पद्धती समजून घेता याव्यात, यासाठी हे म्युझियम उपयुक्त ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button