breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

बिबवेवाडीतील ‘ती’घटना सामाजिक अध:पतनाचं लक्षण : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे । प्रतिनिधी

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय;माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार म्हणाले की, शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल.

“यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटलं की, “अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button