breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भगवान गडावर निघालेल्या हेलिकॉप्टरटचं उड्डाण होताच पुन्हा लँडिंग; जाणून घ्या नेमकं काय झालं?

मुंबई |

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दसरा मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी करोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर भगवान भक्ती गडावर होणारा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे मेळावे ऑनलाईन पद्धतीने होत होते. मात्र पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याला भगवान गडावर पुरेशी काळजी घेऊन येण्याचं पंकजा मुंडेनी आवाहन केले आहे. दरम्यान मेळाव्याला जात असतांना पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली आहे. उड्डाण घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा लँडींग कराव लागल.

दरम्यान, तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली आहे. सावरगावच्या दिशेने जात असतांना पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती. पंकजा मुंडे गोपीनाथ गड येथून औरंगाबाद येथे जाणार होत्या. तेथून मंत्र्यांना सोबत घेऊन त्या सावरगावला जाणार होत्या. परंतु त्यांनी हवाई मार्गाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्यांचा मार्ग बदलला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तीन वर्षापूर्वी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथे भव्य स्मारक उभारून दसरा मेळावा घेण्याची परंपरा कायम ठेवली. गेल्या वर्षी याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला होता. मात्र त्यावेळी पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते.

  • पंकजा मुंडेचे आवाहन…

“१५ ऑक्टोबर रोजी आपल्या सर्वांचा दसरा मेळावा आहे आणि आपण त्यासाठी उस्तुक आहाता याची मला पूर्ण कल्पना आहे. १५ ऑक्टोबर रोजी भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव येथे आपण सर्व जण भक्ती आणि शक्तीची परंपरा जपण्यासाठी येणार आहात. मला तुमची काळजी असल्याने मी विनंती करते ११ ते ११.३०च्या दरम्यान, सभेच्या ठिकाणी थांबावे. घरातून निघताना शिदोरी बांधून घ्यावी. सोबत पाणी असू द्या. करोनाचे संकट जरी टळले असले तरीही आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. प्रत्येकाने मास्क सोबत घेऊन यायचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि प्रशासना मदत करण्याच्या भूमिकेमुळे मागच्या वर्षी पहिल्यांदा आपला प्रत्यक्षात मेळावा झाला नाही. त्यामुळे मला आपल्याशी खूप बोलायचे आहे. तुमचेही ऐकायचे आहे आणि मलाही बोलायचे आहे. मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे आपण पालन करावे,” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button