ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिकन बनवून देण्यास नकार दिल्याने मुलीला तव्याने मारहाण

बापाविरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड | दारू पिऊन चिकन घेऊन आलेल्या बापाला चिकन बनवून देण्यास मुलीने नकार दिला. त्या कारणावरून बापाने मुलीला लोखंडी तव्याने मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी नखातेवस्ती, रहाटणी येथे घडली.रतन नागोराव बर्डे (वय 45, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या बापाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी सकाळी अकरा वाजता दारू पिऊन चिकन घेऊन आला. त्याने आणलेले चिकन बनवून देण्यास फिर्यादी मुलीला सांगितले. मात्र मुलीने चिकन बनवून देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने रतन याने शिवीगाळ करत हाताने मारून करून मुलीच्या डोक्यात लोखंडी तवा मारला. यामध्ये मुलगी जखमी झाली आहे. मुलीने बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button