breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : प्रभाग रचनेत राष्ट्रवादीतील अनेकांचा ‘गेम’ ; अंतर्गत धुसफूस शिगेला !

आत्मकेंद्री राजकारणामुळे स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजीचे चित्र
भाजपातील निमंत्रितांसाठी स्वपक्षीय इच्छुकांनी ‘प्रभाग कोंडी’

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर होणार असली तरी, स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादीच्या एका मातब्बर नेत्याने भाजपाशी हातमिळवणी केली आहे. प्रभाग रचनेत काही प्रभाग भाजपासाठी अनुकूल ठेवले आहे. परिणामी, राष्ट्रवादीतील काहीजणांची ‘विकेट’ जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत स्थानिक पातळीवर अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (दि.१३) जाहीर करण्यात आली. ही प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी प्रभाग रचनेत हे भाग राष्ट्रवादीच्या दिग्गज माजी नगरसेवकांना, इच्छुक उमेदवारांना पोषक नाही, काही भागात विरोधकांचे वर्चस्व आहे तो भाग काढावा, एकगठ्ठा मतदान पडेल, असा भाग जोडावा यासाठी राज्यातील बड्या नेत्यांच्या मदतीने प्रभाग रचनेत हस्तक्षेप केला होता, असे आरोप भाजपाकडून करण्यात आला.
प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या महापालिकेतील मोठ्या अधिकाऱ्याकडे राष्ट्रवादीच्या संबंधित तीन माजी नगरसेवकांनी संपूर्ण शहरातील प्रभाग रचनेबाबत फिल्डिंग लावली होती. तसेच आदेशच अधिकाऱ्याला वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले होते. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली होती. मात्र, राष्ट्रवादीतील ‘त्रिमूर्ती’मधून एकाने फितुरी केल्याची वानगी असून, भाजपा नेत्यांच्या आग्रहासाठी काही प्रभागामध्ये ‘सेटलमेंट’केली आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.
यातूनच इंद्रायणीनगर प्रभागाची हद्द वाढवण्यासाठी मदत केली. चिखली प्रभागाचा एससी राखीव करण्यासाठी, तसेच दिघीचा भाग भोसरीला जोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मदत केल्याचे सांगितले जाते. तसेच, रहाटणीमध्ये एक एससी राखीव काढण्यासाठीही भाजपा-राष्ट्रवादीतील छुप्या युतीमुळेच शक्य झाले आहे. राष्ट्रवादीतील एका मातब्बर नेत्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना ‘चेकमेट’ दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस कमालीची वाढली आहे.
दरम्यान, भाजपातून नाराज नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारी आहे. त्यांच्यासाठी प्रभाग रचनेबाबत ॲडजेस्टमेंट करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांची कोंडी होणार आहे. लोकसंख्याच्या प्रमाणात आरक्षण राखीव होणार असल्यामुळे काही ठिकाणी विशिष्ट भागाची तोड-फोड केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्या उमेदवाराकडे असलेले एकगठ्ठा मतदान विभाजीत होणार असल्यामुळेही नाराजीचा सूर आहे. मात्र, याबाबत उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. याउलट, भाजपामधील नाराजांना पायघड्या आणि नातेसंबंध जोपासण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली आहे.
अजित पवारांकडे तक्रार करण्याची तयारी…
दरम्यान, राज्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष शिगेला पोहोचला असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि भाजपाच्या तगड्या इच्छुकांमध्ये समझोता होताना दिसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर भागातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपा- राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’अशी जाहीरपणे भूमिका घेतली. पिंपरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या दिग्गज माजी नगरसेवकासाठी भाजपाने समझोता केल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकाराची वाच्यता स्थानिक पातळीवर उघडपणे होत नसली, तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्याची तयारी नाराज गटाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button