Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिंदेंच्या बंडाचा फायनल प्लॅन ठरला मुंबई जवळच्या ‘या’ टेकड्यांवर

ठाणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील बंडाचा ठिकाण आधी सूरत आणि सध्या गुवाहाटी असले तरी या बंडाचे पहिले ठिकाण मुंबई जवळ होते. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतील इतके आमदार कसे काय जाऊ शकतात आणि त्याची माहिती सत्तेत असलेल्या पक्षाला कशी काय नव्हती असा प्रश्न सर्वच जण विचारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलाय. अशात एकनाथ खडसेंच्या बंडाच्याचे फायनल प्लॅनिंग हे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झाल्याचे समोर येत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे मतदान सोमवारी दुपारी ४ वाजता संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या काही आमदारांसह ठाण्यातील येऊर टेकडीजवळील उपवन येथे अघोषित दौरा केला होता. येथूनच त्यांनी सूरतला जाण्यापूर्वी पुढचे पाऊल निश्चित केले, असे शिंदेंच्या निकटवर्तीने सांगितले.
महत्त्वाच्या राज्यसभा आणि परिषद निवडणुकीच्या वेळी शिंदे यांना बाजूला केल्यानंतर ते नाराज झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बजेटमध्ये सिंहाचा वाटा कसा मिळतो यावर ते नाराज होते तर शिवसेनेला मात्र फारच कमी वाटा मिळतो असे त्यांचे म्हणणे होते. मतदान झाल्यानंतर काही आमदारांसह शिंदे पोहोचले आणि जेवणासोबत चर्चा झाली. या बैठकीत नाराजी जाहीर करायचे ठरवले आणि ते सुरतला रवाना झाले, असे निकटवर्तीयांनी सांगितले.

शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या ठाणे सेनेच्या आणखी एका कार्यकर्त्याने गेल्या काही काळात ही नाराजी वाढल्याचे सांगितले. “बंड ही तातडीची प्रतिक्रिया असण्याची शक्यता नाही… बंड करण्याची शक्यता आधीपासून होती पण कदाचित राज्यसभा आणि परिषद निवडणुकांमुळे ते पुढे ढकलले गेले असावे,”

शेवटच्या क्षणी ठाण्यातील काही निवडक सहकाऱ्यांना शिंदेंच्या योजनांची माहिती देण्यात आली. त्यांच्यासोबत प्रवास आणि राहण्याच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच सोबत असलेल्या नाराज आमदारांची चांगली काळजी घेतली जाईल याची व्यवस्था करण्यास सांगितले. ठाण्यात शिंदे यांच्या घरच्या बाहेर त्यांच्या निर्णयाशी एकजूट दाखवण्यासाठी बुधवारी संध्याकाळी अनेक पक्षाचे कार्यकर्ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील बंगल्यावर जमले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button