breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्रव्यापार

बार्शीतील शेअर घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपीच्या वडील, भावालाही अटक

बार्शी |

शेअर्स बाजारात आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बार्शीमध्ये मध्यमवर्गीयांसह अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल फटे याच्या वडील, भावाला जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या घोटाळ्यात आतापर्यंत ४० व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्या असून फसवणुकीची रक्कम १२ कोटींच्या घरात गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

विशाल अंबादास फटे (वय ४५) या मुख्य आरोपीसह त्याची पत्नी राधिका (वय ४२), वडील अंबादास गणपती फटे (वय ७०), आई अलका (वय ६८) आणि भाऊ वैभव फटे (वय ४०) अशी या घोटाळ्यातील आरोपींची नावे आहेत. यापैकी त्याचे वडील अंबादास फटे आणि भाऊ वैभव फटे या दोघांना सांगोला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. नंतर त्यांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी विशाल फटे, त्याची पत्नी आणि आई फरारी आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. फटे कुटुंबीयांनी केलेल्या शेअर्स घोटाळ्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होती. शेअर्स बाजारात शेअर्सची गुंतवणूक केल्यास अल्पावधीत आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विशाल फटे याने आपल्या मित्रांसह अनेक मध्यमवर्गीय, बडे नेते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योजकांकडून प्रचंड प्रमाणावर रकमा उकळल्या. सुरुवातीला काही दिवस उत्तम व्यवहार करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर विशाल फटे हा कुटुंबीयांसह बेपत्ता झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button