ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजारांची मदत

पुणे | शासनाने कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार आहे. मावळ तालुक्यातील पीडित कुटुंबीयांनी अर्ज करावा, असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी http://mahacovide19relief.in या वेबसाइट वरुन ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास तहसिल कार्यालय मावळ (वडगाव) येथे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्जदाराचे आधार कार्ड, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड प्रत, मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला, अर्जदार आधार कार्ड आणि लिंक बँक खाते क्रमांक, अर्जदाराच्या बँक खात्याचा रद्द केलेला चेक, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय रिपोर्ट, वैद्यकीय रिपोर्ट नसेल तर मयत व्यक्तीचा आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा सीटी स्कॅन रिपोर्ट आदी कागदपत्रे आवश्यक असल्याचेही तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button