breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधाऱ्यांची थेट पद्धतीने खरेदी सुरूच; विरोधकांचा संशय

  • आता रूग्णालये, दवाखान्यांसाठी ५१ लाखांच्या चादर, बेडशीटची खरेदी

पिंपरी |

पिंपरी – चिंचवड महापालिकेची रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी सोलापूरी चादर, बेडशीट आणि ब्लँकेट खरेदी करण्यात येणार आहेत. थेट पद्धतीने राज्य यंत्रमाग महामंडळाकडून हे साहित्य घेण्यात येणार असून त्यासाठी ५१ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहे.

महापालिकेची रूग्णालये आणि दवाखाना व्यवस्थापनांनी सोलापूरी चादर, बेडशीट आणि ब्लँकेट आदी साहित्याची मागणी केली आहे. त्यानुसार, ९ हजार २८२ बेडशीट, १ हजार ३२७ नग सोलापुरी चादर आणि १ हजार ३१३ ब्लँकेट आदी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाकडून ९ जुलै २०२० रोजी यासंदर्भात दर निश्चित करण्यात आले आहेत. हा करार ३० एप्रिल २०२१ पर्यंत करण्यात आला आहे. या कराराप्रमाणे महामंडळाने सपेâद रंगाच्या एका बेडशीटचा दर ४२६ रूपये ६ पैसे, एका सोलापूरी चादरचा दर ३७२ रूपये आणि एका ब्लँकेटचा दर ५३० रूपये असा सादर केला आहे. त्यानुसार, सोलापूरी चादर खरेदीसाठी ४ लाख ९३ हजार रूपये, बेडशीट खरेदीसाठी ३९ लाख ५४ हजार रूपये आणि ब्लँकेट खरेदीसाठी ६ लाख ९५ हजार रूपये असा एवूâण ५१ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहे. ही खरेदी कोणताही करारनामा न करता थेट पद्धतीने करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button