पिंपरी / चिंचवड

गुळवेवस्ती येथे झालेल्या खुनातील मयत तरुणाची ओळख पटली

पिंपरी l प्रतिनिधी

गुळवेवस्ती भोसरी येथे एका तरुणाचा निर्घृणपणे खून झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री उशिरा उघडकीस आला. या प्रकरणातील मयत तरुणाची ओळख पटली असून याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंटू कुमार सहदेव शाह (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गुळवेवस्ती, भोसरी येथे एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तरुणाच्या शरीरावर वार करून त्याच्या चेह-यावर दगडाने मारून चेहरा विद्रुप केला असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले. त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. चेहरा विद्रुप झाल्याने सुरुवातीला तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी आल्या. मात्र पोलिसांनी मयत तरुणाची ओळख पटवली आहे. त्याचा खून कोणी आणि का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button