पिंपरी / चिंचवड

प्राधिकरणातील शंकराच्या मंदिरावरील कळस चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

निगडी प्राधिकरण येथील शंकराच्या मंदिरावरील कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे.

सचिन बाबुराव बनसोडे (वय 42, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथील शंकराच्या मंदिरावर चार पितळी कळस होते. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. 9) रात्री दहा ते गुरुवारी (दि. 10) सकाळ आठ वाजताच्या कालावधीत मंदिरावरील चार पितळी कळस आणि दक्षिणा पेटीतील रोख रक्कम असा एकूण पाच हजारांचा ऐवज चोरून नेला.

चोरटे मंदिराच्या पाठीमागील लोखंडी कंपाउंडची जाळी उचकटून मंदिरात आले असल्याचे पाहणीत उघडकीस आले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button