breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोव्हीशील्ड आणि कॅव्हॅक्सिन लसी आता मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार,DCGI ची सशर्त मंजुरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. कोव्हीशील्ड आणि कॅव्हॅक्सिन या लसी सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आणि कॅव्हॅक्सिन या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे. म्हणजेच आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत २७५ रुपये असणार आहे. तसेच यावर सर्व्हिस चार्ज १५० रुपये इतका लागण्याची शक्यता आहे. दरम्यान कोवॅक्सीनची सध्या खुल्या बाजारात १२०० रूपये किंमत आहे. तर कोविशील्डचा एक डोस ७८० रुपये आहे. दोन्ही लसींवर १५० रुपये सर्व्हिस चार्ज आहे. सध्या देशात दोन्ही डोस आप्तकालीन वापरासाठी उपलब्ध आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोव्हीशील्ड आणि कॅव्हॅक्सिन या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागेल.

परवानगीनंतर कोव्हीशील्ड आणि कॅव्हॅक्सिन या लस रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे. खुल्या बाजारात विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ज्यांना लस घ्यायची आहे, ते मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊ शकता, अन् डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतात. लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर देशातील लसीकरणाला आणखी वेग येईल. तसेच सरकारवरील भारही कमी होईल. लसीची किंमत ठरल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button