breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अंबानी परिवारात लवकरच शहनाई गुंजणार

अंबानी परिवारात पुन्हा सनईचे मंगल सूर
देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरात लवकरच शहनाई गुंजणार आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र जय अनमोल यांचा विवाह निश्चित झाला आहे. त्यांच्या भावी पत्नीचे नाव कृष्णा शाह असे आहे. त्यांचा साखरपुडा झालेला असून आता लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या साखरपुडय़ाची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली आहेत. त्यांची भावी पत्नी कृष्णा कृषा या टोपण नावाने ओळखली जाते. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कृष्णा शहा यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झाले आहे. त्यांनी तेथे मास्टर्स केले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातही त्यांनी पॉलिटिकल इकॉनॉमिचे शिक्षण घेतले आहे. अनमोल अंबानी हे 30 वर्षांचे असून 12 डिसेंबरला आपल्या वाढदिवशीच त्यांनी साखरपुडा केला. अनमोल हे रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे कार्यकारी संचालक असून आपले आजोबा धीरुबाई अंबानी त्यांचे आदर्श आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button