आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहरात 34 नवीन रुग्णांची नोंद; 37 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 34 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शहरातील 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 499 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 76 हजार 697 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 442 सक्रिय रुग्ण शहरात आहेत त्यातील 189 रुग्ण गृहविलगीकरणात असून 253 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 21 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 330 आहेत. आज दिवसभरात 13 हजार 666 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 23 लाख 86 हजार 354 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.