पिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

अधिकारी महासंघाच्या मागण्यांप्रती मुख्यमंत्री सकारात्मक : ग. दि. कुलथे

कल्याणकेंद्रासाठी अधिकाऱ्यांना योगदान देण्याचे आवाहन

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ हा राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या मागण्या आणि हक्कांसाठी सतत कार्यरत असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महासंघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसाचा आठवडा, कोरोनामुळे निधन झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा योजना ही त्याचीच उदाहरणे आहेत, असे मत महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.

मुंबई येथे महासंघाचे कल्याणकेंद्र उभारण्याच्यादृष्टीने निधी संकलनासाठी तसेच जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांशी कुलथे तसेच महासंघाचे पदाधिकारी पुणे येथे संवाद साधत आहेत. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिंमतराव खराडे, महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस इंजि. विनायक लहाडे, सहचिटणीस सुदाम टाव्हरे आदी पदाधिकारी तसेच महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते.

कुलथे म्हणाले, राज्याच्या प्रशासनात आपले अधिकारी अत्यंत कार्यक्षमतेने काम करत आहेत. मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. आता सातव्या वेतन आयोगाच्या वेतनत्रुटींबाबतचा खंड-2, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, महागाई भत्त्याचा फरक आदी मागण्या मान्य करुन घ्यायच्या आहेत. त्यासाठी महासंघ सतत पाठपुरावा करत राहील. महासंघाची मुंबई येथे भव्य इमारत असावी अशी भूमिका घेऊन देशभरामध्ये संघटनक्षेत्रात मानबिंदू ठरेल असे कल्याणकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी किमान 5 हजार रुपयांचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खराडे यांनी आपले योगदान म्हणून 11 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच यासाठी महसूल विभागातून सर्व अधिकाऱ्यांकडून योगदान मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

सहकार व लेखा विभागाकडून 17 लाखाचा निधी

महासंघ कल्याण केंद्र इमारत निधी संकलन व महासंघ कार्याची माहिती देण्यासाठी महासंघाचे मुख्य सल्लागार कुलथे यांनी सहकाऱ्यांसह सहकार आयुक्त कार्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासन विभागातील सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक सहाय्यक निबंधक ,पणन संचालनालयातील सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक तसेच लेखापरीक्षण विभागातील सहनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक व दोन्ही विभागाचे वर्ग-1 व वर्ग-2 राजपत्रित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्याण केंद्राच्या मदतीसाठी सहकार व लेखा परीक्षण विभागाच्यावतीने एकूण रुपये सतरा लाख इतकी रक्कम महासंघाच्या प्रतिनिधीकडे सहकार विभागाच्या वतीने सुपूर्द करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button