breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडल्याचे प्रकरण आता एनआयएकडे

मुंबई – जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांचा साठा असलेली कार सापडली होती. त्यानंतर या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यूही झाला आहे. या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळत असल्याने अखेर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबईत स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्यावर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत होता. त्यानंतर मनसुख हिरेन या व्यापाराचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळल्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आलं. मनसुख हिरने यांची पत्नी आणि मोठ्या मुलाने एटीसच्या कार्यालयात दाखल होत हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

25 फेब्रुवारी रोजी मुंबईत विस्फोटांनी भरलेली गाडी सापडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने NIA कडे मागणी केली होती. मुंबईतील कार्मिकल रोड येथे उभ्या केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर या मागील नेमकं कोण आहे याचा तपासही सुरू झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खुण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button