breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

तब्बल ३८ वर्षांनंतर घरी येणार शहीद जवानाचे पार्थिव; सियाचीनमधील बर्फात सापडला होता मृतदेह

उत्तराखंडः आज संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत आहे. तर एकीकडे सियाचीनवरील मोहिमेत शहिद झालेले शिपाई चंद्रशेखर हार्बोला यांचे पार्थिव आज ३८ वर्षांनंतर स्वगृही परतत आहेत. उत्तराखंड राज्यातील हल्दानी यांच्या घरी तब्बल ३८ वर्षानंतर शहीद जवान चंद्रशेखर हार्बोला यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.

२९ मार्च १९८४ साली सियाचिनमध्ये ऑपरेशन मेघदूत राबवण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान हर्बोला यांनी वीरमरण आले. सीयाचिनमध्ये आलेल्या हिमवादळात १९ सैनिक दबले गेले. त्यातील १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, पाच सैनिकांचे मृतदेह तेव्हा सापडले नव्हते. त्यानंतर भारतीय लष्कराने हार्बोला यांच्या कुटुंबीयांना चंद्रशेखर शहीद झाल्याची सूचना दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पहाडी परंपरेनुसार हार्बोला यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.

यंदा सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळी भारतीय लष्करांनी मेघदुत मोहिमेत बर्फाखाली दबलेल्या सैनिकांचा पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळीस शेवटच्या प्रयत्नांत लान्स नायक चंद्रशेखर हर्बोला यांच्या अस्थि ग्लेशिअरमध्ये असलेल्या जुन्या बंकरमध्ये सापडल्या. भारतीय लष्कराने डिस्कच्या आधारे चंद्रशेखर यांची ओळख पटवली. यावर लष्कराने दिलेला (४१६४५८४) हा नंबर लिहला होता.

वयाच्या २८व्या वर्षी वीरमरण

१९८४ साली लान्स नायक चंद्रशेखर हार्बोला यांना वीरमरण आले तेव्हा त्यांचे वय अवघे २८ वर्ष होते. त्यावेळीस त्यांची मोठी मुलगी आठ वर्षांची होती. तर, लहान मुलगी फक्त ४ वर्षांची होती. हार्बोला यांच्या पत्नीचे वय २७ होते.

शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

आता ३८ वर्षे चंद्रशेखर यांचे पार्थिव सियाचीनमधील बर्फात दबलेले होते. आज १५ ऑगस्ट रोजी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. तसंच, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

चेहराही पाहू शकली नाही पत्नी

चंद्रशेखर हार्बोला यांच्या पत्नीचे वय आता ६५ वर्ष आहे. चंद्रशेखर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मोठ्या हिमतीने स्वतःला सांभाळलं. पतीचे शेवटचे दर्शनही त्या घेऊ शकल्या नाहीत हे एकच दुखः त्यांना सलतंय. हार्बोला यांची मोठी मुलगी आता ४८ वर्षांची असून वडिलांच्या मृत्यूसमयी ती फारच लहान होती. मला त्यांचा चेहराही आठवत नाही, असं त्या सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button