ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह हाती

पिंपरी चिंचवड | गणपती विसर्जनाच्या वेळी इंद्रायणी नदीत दोनजण बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले होते तर दुसरी व्यक्ती बेपत्ताच होती. दरम्यान, बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह आज ( दि.21 ) हाती लागला . भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्तीजवळ रविवारी (दि.१९) संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.प्रज्वल रघुनाथ काळे (वय18) व दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय 20) अशी या दुर्घटनेत नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे असून यापैकी प्रज्वल काळे याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले होते, तर दत्ता ठोंंबरे हो तरुण बेपत्ताच होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डुडुळगावच्या माऊली वस्ती येथील ठोंंबरे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यांच्यापैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय 30) नितीन अर्जुन ठोंंबरे (वय 39), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय 20) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय 18) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले. नदी पात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले. बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते. मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते आत पाण्यात गेले होते.

भोसरी एमआयडीसी पोलीस, आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली. त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. दरम्यान, दुसऱ्या तरुणाच्या शोधासाठी एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, अग्निशमन दलाला घटनास्थळी दाखल झाले, रात्रभर शोधमोहीम सुरूच होती. परंतु,अग्निशमन दलाला रात्री पर्यंत बॉडी मिळाली नाही. मात्र आज सकाळी बॉडी तरंगत असल्याची माहिती मिळाली. अद्याप अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button