breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

माऊंट त्रिशूल मोहिमेतील चार नौदल कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले

नवी दिल्ली |

उत्तराखंडच्या चमोली भागात गिर्यारोहण मोहिमेवर गेलेल्या भारतीय नौदलाच्या पथकातील पाच जण शुक्रवारी माऊंट त्रिशूलवर झालेल्या हिमस्खलनानंतर बेपत्ता झाले होते. त्यातील चार जणांचे मृतदेह शोधपथकाला शनिवारी आढळून आले, अशी माहिती नौदलातर्फे देण्यात आली.

मुंबईतून ३ सप्टेंबरला मोहिमेवर गेलेल्या नौदलाच्या या गिर्यारोहण पथकात २० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी दहा जणांनी शुक्रवारी सकाळी माऊंट त्रिशूलची चढाई सुरू केली होती. या दहा जणांपैकी पाच जण सुरक्षित असून हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी पथक पाठविण्यात आले होते. कमांडर रजनीकांत यादव, योगेश तिवारी आणि आनंद कुकरेती, तसेच जेसीओ हरीओम यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी यादव आणि कुकरेती हे मुंबईतील नाविक तळात तैनात होते.

  • प्राप्तिकर छाप्यात ५०० कोटींची संपत्ती उघड

दिल्ली : प्राप्तिकर खात्याने अहमदाबाद येथील स्थावर मालमत्ता आस्थापनेवर टाकलेल्या छाप्यात पाचशे कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड झाली आहे. यात काही विकसक व दलाल यांचा संबंध असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे. एकूण तपासात पाचशे कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली असून समूहाच्या २२ आस्थापनांवर छापे टाकण्यात आले, त्यात काही दलालांचाही समावेश होता. २८ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button