breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ठरलं! IPL चे उर्वरित सामने सप्टेंबरपासून यूएईत होणार

नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२१चे सामने थांबवावे लागले होते. मात्र, आता आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईत होणार असूनसप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील असा निर्णय गेण्यात आला आहे. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.

आज बीसीसीआयची विशेष बैठक (SGM) घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतामधील करोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी ‘आयपीएल’चे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button