Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसैनिकांशी संवादानंतर ठाकरे आक्रमक, आणखी ४ आमदारांवर कारवाईसाठी याचिका, सेना अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या तालुकाप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी संघर्ष सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्यावतीनं काल विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे १२ आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं त्यापुढील खेळी करत आणखी चार आमदारांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आलं आहे.

शिवसेनेकडून आणखी ४ आमदारांविरोधात याचिका

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १२ जणांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिका नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. आज आणखी ४ जणांवर कारवाई करावी म्हणून शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. कालचे १२ आणि आजच्या ४ याचिका अशा एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

४ आमदार कोण?
शिवसेनेच्यावतीनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आज आणखी ४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेकडून नेमक्या कोणत्या आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, हे समोर आलं नाही.

शिवसेनेकडून यापूर्वी १२ जणांविरोधात याचिका

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांच्याविरोधात याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर करण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काल दिली होती.

विधानसभा उपाध्यक्षांना अधिकार नाहीत, अपक्ष आमदार मैदानात
उरणचे अपक्ष महेश बालदी आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना एक पत्र लिहिलं आहे. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळं आमदारांचं निलंबन करण्याचे अधिकार झिरवाळ यांना नसल्याचं महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं काल १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर केल्या होत्या. आज शिवसेना नेते त्यांची बाजू मांडण्यासाठी विधानभवनात पोहोचले आहेत.

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; शिवसेनेचा आणखी एक आमदार गुवाहाटीत दाखलं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button